*श्रावण हा मनभावन*


*मऊ मुलायम  ऊन सोनसळी कोवळे*

*वाऱ्यावरती मजेत डोलती झाडे फुले*


*स्वच्छ नितळ पारदर्शी आरस्पानी*

*प्रतिबिंब दिसे जळात पानोपानी*


*हवे हवेसे वाटे ऊन आनंदी*

*पक्षीही मुक्तपणे पंख पसरवून बसती मोदे*


*गवत लुसलुशीत हिरवे पोपटी*

*गालिचा अंथरला स्वागतासाठी*


*चराचर असे सचैल नाहुनी सजलेले*

*जणू आता कोणास्तव नटलेले*


*मध्येचं पर्जन्याचे किंचित हलके तुषार*

*वाटे शिंपडले आसमंतात सुगंधी अत्तर*


*बघता  वार तिथि कॅलेंडर*

*सापडे मला माझ्याच प्रश्नाचे उत्तर*


*अरे हा तर निसर्ग सज्ज जाहला*

*सगळीकडे जल्लोष एकच श्रावण आला श्रावण आला*


*सौ.पूर्वा लाटकर*

*८ ऑगस्ट २०२६*

Comments