ऋग्वेद

 *आजी आजी म्हणून लावतोस लळा*

*पाठीमागून येऊन पडतोस माझ्या गळा*


*हे काय ते काय प्रश्न तुझे हजार*

*विचारून विचारून करतोस सर्वांना बेजार*


*सगळंच जाणून घेण्याची तुझी उत्सुकता फार*

*तुझ्या निरागस डोळ्यात दिसे अपरंपार*


*खेळणी विखुरली तुझी घरभर*

*तुझी नजर पडे सुरी कात्री गॅस लायटरवर*


*हवे तुला रोज काही तरी नवीन शिकायला*

*सगळ्यांना दमवतोस लावतो मागे मागे पळायला*


*आकाशातले पक्षी  दिवसा आणि रात्रीचा मुन*

*गंमत वाटते तुला हे  सगळं बघून*


*बोलतोस तू मराठी छान आणि स्पष्ट*

*अध्ये मध्ये  बोलतोस एखादा डच शब्द*


*तू गेल्यावर काढत बसतो तुझ्या आठवणी*

*करतो पुन्हा पुन्हा फोटो आणि व्हिडीओची उजळणी*


*सौ.पूर्वा लाटकर*


*ऋग्वेदची आजी*

Comments