*कॅरम बोर्ड*
*सौ. पूर्वा लाटकर*
*७.१.२०२२*
आयुष्य जगतात तुम्ही कॅरम बोर्डच्या पटासारखं
कधी वाट्याला आल्या काळया सोंगट्या
तर कधी आल्या पांढऱ्या सोंगट्या
दोन्हीही वेळा स्थितप्रज्ञ राहून खेळलात तुम्ही
कधी दूरवरच्या पॉकेटवरची सोंगटी
सहजतेने घेतली
तर जवळच्या सोंगट्यानी दमछाक केली
क्विनचा नव्हताच मोह तुम्हांला
घेतलीच क्विन तर कव्हरशिवाय नाही जिंकली
कधी गेम झाला स्टार्ट टू फिनिश
तर कधी संकटांवर केला स्ट्रायकरने सर्जिकल स्ट्राईक
गेम असाच चालू राहणार आहे
नव्या उमेदीने,नव्या ऊर्जेने, नव्या उत्साहाने......
वयाच्या साठीनंतरही .......
(*साठ्याव्या वाढदिवसानिमित लिहिलेली कविता*)
Comments
Post a Comment