*अलिबाग*



*गाव तसं सहज सुटत नाही*

*गावाची नाळ तशी  तुटता तुटत नाही*


*तन शहरात राहतं नाईलाजाने*

*मन मात्र रेंगाळतच राहतं गावामध्ये*


*गावची आठवण आणि आठवणीतला गाव*

*येते  दाटून सारी सय मनी ऊमाळ्याचा भाव*


*वाटे आता सागरच यावा किनाऱ्याला भेटाया*

*शहरी कोलाहलात शांतता मिळाया*


*गावाचा आपलेपणा जपणारी माणसे*

*मनापासून भरभरून बोलणारी माणसे*


*जाणवे वानवा याची शहरामध्ये*

*सगळेच वाटतात परके वागतात तुसडेपणाने*


*हातातून वाळू निसटावी तसे आयुष्य निसटते*

*मनांत मात्र गाव कायम वस्तीला असते*


*सौ.पूर्वा लाटकर*


*१९ ऑक्टोबर २०२६*

Comments