आली आली म्हणतां 

सरली दिवाळी


आकाश कंदिलाच्या झगमगाटात 

डोळे दिपवून गेली दिवाळी



विस्कटलेल्या फिकुटलेल्या रांगोळीत 

पुसटशी दिवाळी



पणतीच्या विझलेल्या  वातीत 

काजळलेली दिवाळी


 घरभर पाहुण्यांच्या वर्दळीने

शांत शांत दिवाळी





चकली लाडवाच्या तुकड्यात

संपत आली दिवाळी


उटणे सुगंधाच्या वासात 

रेंगाळली दिवाळी 


कोऱ्या कपड्याच्या चुरगळाटात

शिल्लक राहिली दिवाळी


नात्यांच्या बंधात घट्ट बांधून

गेली दिवाळी


परंपरा रिती रिवाज टिकवून

गेली दिवाळी


आयुष्यात चार क्षण फक्त सुखाचे

सांगून गेली दिवाळी


पुन्हा वर्षभराची प्रतीक्षा 

येते म्हणून सांगून गेली दिवाळी


आठवणींत तुमच्या आमच्या

राहून जाईल ही दिवाळी


*सौ.पुर्वा लाटकर*


*१२ नोव्हेंबर २०२६*

Comments