कित्ती कित्ती गोड माझी दुधावरची साय
किती लावू जीव अन् किती करू गं माय
छोटीसी जीवणी दात इवले इवले
ओठ गुलाबी नाजुकसर अगदी कोवळे
डोळ्यात निरागस कुतुहलाचे भाव
किंचित खट्याळपणा त्यात दडलाय की राव
कधी वाटतो आईसारखा मातृमुखी
तर कधी दिसते त्याच्यात बाबांची छबी
दोन्ही घरचा आहे तो लाडोबा
आम्ही म्हणतो नाना त्यांचा तो बब्या
सगळ्यांना लावतो आपल्या बोलण्याने लळा
रोज रोज व्हिडीओ कॉल केला
तरी नाही येत कंटाळा
*सौ पूर्वा लाटकर*
Comments
Post a Comment